नवीन उपक्रम


निमंत्रण
" दिपोत्सव नारायणगड "
गतवर्षीप्रमाणे या हि वर्षी ऐतिहासिक वास्तु नारायणगडावर दिवाळी निमित्त दिपोत्सव आयोजित केला आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवाळीचा उत्सव प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून असतो. आपण आपल्या घराच्या अंगणात जशी पणती पेटवीत आहात, दिवा प्रज्वलित करत आहात तसाच दिवा आपल्या नारायणगडावर आणि गडदेवतेच्या गाभाऱ्यात प्रज्वलित करावा आणि दुर्गप्रेमाचा हा दिवा सातत्याने तेवत ठेवावा तो मालवू न देत एक वेगळा संदेश देत दिवाळी साजरी केली तरच खरा दिपोत्सव साजरा होईल.
जशी "दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते, तसे माणसाला माणूस जोडत गेलं की " जागृत दुर्गसंवर्धनाचे " एक सुंदर नातं तयार होतं. हेच नातं सदैव बहरत राहो, या साठी गुरुवार दि.०३/११/२०१६ रोजी ६.३०  वा. गड पायथ्याशी एकत्र जमावे त्यासाठी एक दिवा सोबत आणावा. नियोजन केल्यया प्रमाणे दिप प्रज्वलित करून या नयनमनोहर क्षणाचे साक्षीदार होवूया
यासाठी सस्नेह निमंत्रण...!
अध्यक्ष-नारायण गड दुर्गसंवर्धन समिती
शिवाजी ट्रेल 
समस्त ग्रामस्थ खोडद -हिवरे तर्फे नारायणगाव 
दुर्गप्रेमी- निसर्गमित्र 

No comments:

Post a Comment